Ad will apear here
Next
अभ्यास कसा कराल
शालेय जीवनात अभ्यास करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे नेमून दिलेले कामच असते; पण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. करू, घाई काय एवढी, असे म्हणत चालढकल केली जाते. काही वेळा, तर आपल्याला सर्व काही येते हा आत्मविश्वासच घाताचे कारण दिसते.

दहावीत चांगले गुण पडले, तरी महाविद्यालयीन अभ्यासात घसरगुंडी होते, असे का होते हे समजावून देत शशिकांत कोनकर यांनी ‘अभ्यास कसा कराल!’ या छोटेखानी पुस्तकातून मोलाचे मार्गदर्शन केले आहे. परीक्षेतील यश बुद्धिमत्ता, मेहनत यावरच अवलंबून नसते, तर त्यासाठी अभ्यासाची पद्धतही महत्त्वाची ठरते.

ती काय आहे, अभ्यासाचे वेळापत्रक, त्याचे फायदे, अभ्यास किती वेळ करावा, विविध विषयांचे उत्तम वाचन कसे करावे, नोट्स कशा काढाव्यात, स्मरणशक्ती कशी वाढवावी, पाठांतर कसे करावे, त्याचे फायदे, परीक्षेची तयारी यांविषयी अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. अभ्यासाच्या विविध पद्धती व काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत; तसेच विद्यार्थ्यांनी आहार, प्रकृतीकडे कसे लक्ष द्यावे हेही सांगितले आहे.

प्रकाशक : अनमोल प्रकाशन
पाने : ११७
किंमत : ५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZTIBP
Similar Posts
संस्कृत-मराठी-इंग्लिश शब्दकोश संस्कृत शब्दांचे अर्थ मराठीत व इंग्रजीत एकत्र देणारा हा पहिलाच शब्दकोश आहे. यामध्ये शब्दाच्या अर्थाशिवाय व्याकरणाच्या दृष्टीने त्याची नामलिंग, सर्वनाम, विशेषण, अव्यय, गण, धातू यांची माहितीही कंसात दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोहोंसाठी तो उपयुक्त ठरावा.
श्री गुरुलीलामृत श्री अक्कलकोट महाराज यांची महती व माहिती सर्वदूर पोचलेली आहे. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची कायम रीघ असते. भक्तांच्या पाठीशी कायम उभे असलेल्या स्वामी सामर्थ्यांच्या लीला कै. गोपाळराव विद्वांस यांनी ‘श्री गुरुलीलामृत (कथासारासह)’ या एकवीस अध्यायी पोठीतून कथन केल्या आहेत.
दैनंदिन आरोग्य-गाथा आयुर्वेदानुसार स्वास्थ्य कसे सांभाळावे याचे मार्गदर्शन डॉ. सुभाष रानडे आणि डॉ. राजेंद्र देशपांडे यांनी या पुस्तकातून केले आहे.
अनमोल सणांच्या गोष्टी आपले सण व उत्सव हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. आपली संस्कृती टिकून राहण्यास आणि पुढे नेण्यास ते उपयुक्त ठरतात; तसेच सद्गुणांची परंपरा कायम राखतात. त्यामुळे नव्या पिढ्यांना सणांचे महत्त्व समजायला हवे. त्या दृष्टीने श्रीकांत गोवंडे यांनी या पुस्तकात आपल्या सण-उत्सवांची माहिती दिली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language